लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता लवकरच; हफ्त्यासोबतच ४०,००० रुपये कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार Ladki Bahin Yojana May Installment Loan Update

2 Min Read
Ladki Bahin Yojana May Installment Loan Update

Ladki Bahin Yojana May Installment Loan Update : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास खात्याकडे आदिवासी विकास विभागाकडून तब्बल ₹३३५.७० कोटींचा निधी वळवण्यात आला असून, याच निधीतून मे महिन्याचा हप्ता देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

सध्या मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले असून, येत्या ४ दिवसांत म्हणजेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील, अशी शक्यता आहे. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जर मे महिन्याचा हप्ता वेळेत जमा झाला नाही, तर मे आणि जून महिन्याचा मिळून एकत्रित ३००० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडून या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याच सांगितल जात आहे.

लाडकी बहीण योजनेतून सध्या देण्यात येत असणाऱ्या १५०० रुपयांच्या हफ्त्यासोबतच लाडक्या बहिणींना ४०,००० रुपये कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे या कर्जाचा हफ्ता लाडकी बहीण योजनेच्या दरमहा जमा होणाऱ्या हफ्त्यातूनच फेडून घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करणे हा आहे. त्याच अनुषंगाने लाडकी बहीण योजनेतून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण कर्ज योजना (Ladki Bahin Karj Yojana) सुरु केली जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 सरकारच्या या योजनेतून नवरा-बायकोला मिळणार दरमहा 9,250 रुपये पेन्शन! जाणून घ्या सविस्तर माहिती.

Share This Article