Ladki Bahin Yojana May June Installment News : लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यावर जमा न झाल्याने राज्यभरातील लाखो महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महिलांना दरमहा १५०० रुपये देणाऱ्या या योजनेचा मे-जूनचा हप्ता एकत्र म्हणजेच ३००० रुपये मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत देण्यात येते. एप्रिल महिन्यात हप्ता वेळेवर मिळाल्यानंतर मे मध्ये मात्र महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यासंदर्भात मोठ वक्तव्य केल आहे. “मी ३.३७ कोटी रुपयांच्या फाइलवर सही केली आहे,” अस त्यांनी स्पष्ट केल असून, त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी आशा व्यक्त होत आहे. काही अहवालांनुसार, सरकार येत्या जून महिन्यात वटपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मे-जूनचे ३००० रुपये एकत्रितपणे महिलांच्या खात्यावर वर्ग करण्याचा विचार करत आहे.
दरमहा महिला व बालविकास मंत्रालयाकडून हप्त्याबाबत घोषणा केली जाते. मात्र, या महिन्यात अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आहे. ही एकत्र रक्कम मिळणार की हप्ते स्वतंत्रपणे जमा होणार, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.
सरकारकडून लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा असून, महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत घोषणेकडे लक्ष द्यावे, अस आवाहन करण्यात आल आहे.
🔴 हेही वाचा 👉 आधारनंतर सरकारचा मोठा निर्णय! प्रत्येक नागरिकासाठी ‘डिजिटल पत्ता’ लवकरच अनिवार्य होणार.