Majhi Ladki Bahin Yojana Latest News : माझी लाडकी बहिण योजनेबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेला उधाण आले होते. विरोधकांकडून आरोप करण्यात येत होता की, लाडकी बहीण योजना सरकार हळूहळू बंद करण्याच्या तयारीत आहे. मात्र, आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट सांगितले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही.
राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि ती इथून पुढेही सुरुच राहील, अस एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल. त्यांनी रविवारी राज्यातील महिलांना उद्देशून सांगितल की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद केली जाणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ही योजना कायम सुरुच राहणार आहे.”
विरोधकांचा आरोप, सरकार वचनपूर्ती करत नाही
लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ न केल्यामुळे आणि सरकार वचनपूर्ती करत नसल्यामुळे लवकरच ही योजना बंद होईल, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाही. यामुळेच विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास – “डबल इंजिन सरकार वचनपूर्ती करेल”
“लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कारण आमच डबल इंजिन सरकार आहे आणि आम्ही दिलेली सर्व वचने पूर्ण करतोच,” अस सांगून एकनाथ शिंदे यांनी सरकारचा विश्वास पुन्हा अधोरेखित केला. “मुद्रणातील चुका आम्ही करत नाही,” असही त्यांनी ठामपणे नमूद केल.
सध्या मिळतोय दरमहा ₹1,500 चा लाभ
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सध्या दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील करोडो महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे योजना बंद होणार असल्याची अफवा पसरल्यावर अनेक महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, सरकारच्या स्पष्ट भूमिकेमुळे आता त्या चिंतेला पूर्णविराम मिळाला आहे.
🔴 हेही वाचा 👉 मोफत उपचारासाठी ‘हे’ कार्ड आहे अत्यंत उपयुक्त! जाणून घ्या कार्ड मिळवण्याची सोपी प्रक्रिया.