Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटींचा निधी मंजूर, आदेश जारी, लवकरच खात्यात जमा होणार पैसे

2 Min Read
Ladki Bahin Yojana Tribal Fund Transfer 335 Crore Maharashtra Government

Ladki Bahin Yojana Tribal Fund Transfer 335 Crore Maharashtra Government : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आता आदिवासी विकास विभागाकडून मोठा आर्थिक हातभार देण्यात आला आहे. अनुसूचित जमातीतील महिलांना लाभ देण्यासाठी मे महिन्यासाठी या योजनेसाठी तब्बल ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. शुक्रवारी आदिवासी विकास विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, या निर्णयामुळे आदिवासी महिला लाभार्थींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मानधनाचे वाटप लवकरच होणार आहे.

या निधीचा उपयोग केवळ त्या आदिवासी महिलांसाठी केला जाणार आहे, ज्या योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत. यापूर्वीच राज्य सरकारने जाहीर केले होते की अनुसूचित जमातींतील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा निधी आदिवासी विकास विभागाच्या बजेटमधूनच दिला जाईल. याच पार्श्वभूमीवर २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी २१,४९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या पैकी आदिवासी विकास विभागासाठी देण्यात आलेल्या ३,४२० कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठीचा ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळवण्यात आला आहे. हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा होणार असून, यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

राज्य सरकारचा हा निर्णय आदिवासी भागांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल मानल जात आहे. यामुळे अनेक महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ लवकरच मिळेल आणि त्यांना स्वयंपूर्णतेचा आधार मिळेल.

🔴 हेही वाचा 👉 दरमहा १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन देणारी सरकारी योजना, सविस्तर माहिती जाणून घ्या.

Share This Article