Interest Free Loan For Women: महिलांसाठी 5 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

2 Min Read
Lakhpati Didi Yojana Interest Free Loan For Women

Lakhpati Didi Yojana Interest Free Loan For Women : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ‘लखपती दीदी योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जाते. विशेष म्हणजे, या योजनेत सहभागी महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिले जाते.

योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

लखपती दीदी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना स्वयं-सहायता समूहांशी (Self Help Groups – SHG) जोडले जाते, जिथे त्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

लखपती दीदी योजनेतून किती कर्ज मिळते?

लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ₹1 लाख ते ₹5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
विशेष बाब म्हणजे या कर्जावर कुठलाही व्याज दर लावला जात नाही, म्हणजेच हे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त असते.

Lakhpati Didi Yojana अर्ज प्रक्रिया कशी आहे?

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एखाद्या स्वयं-सहायता समूहात (SHG) सामील व्हावे लागेल.
  2. त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते.
  3. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमचा बिझनेस प्लॅन तयार करावा लागतो.
  4. तुमचा बिझनेस प्लॅन SHG च्या माध्यमातून सरकारकडे सादर केला जातो.
  5. तुमच्या प्लॅनची तपासणी पूर्ण झाली की कर्ज मंजूर केले जाते.

Lakhpati Didi Yojana आवश्यक कागदपत्रे:

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
सक्रिय मोबाइल नंबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या विविध भाषणांमध्ये या योजनेचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये त्यांनी या योजनेमुळे लाखो महिला आत्मनिर्भर झाल्याचं सांगितल आहे.

🔴 हेही वाचा 👉 एका मिनिटात अर्ज सक्रिय करण्याची सोपी पद्धत येथे जाणून घ्या.

Share This Article