एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 12000 रुपये आजीवन पेन्शन; सर्व वयोगटासाठी नागरिकांसाठी LIC Smart Pension Plan

2 Min Read
LIC Smart Pension Plan Lifetime Monthly Income

LIC Smart Pension Plan Lifetime Monthly Income : भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देण्यासाठी एक प्रभावी योजना सुरू केली आहे — स्मार्ट पेन्शन योजना. या योजनेद्वारे फक्त एकदाच गुंतवणूक केल्यावर आजीवन पेन्शन मिळते, त्यामुळे ही योजना सर्व वयोगटासाठी नागरिकांसाठी फायदेशीर आहे.

सिंगल व जॉइंट दोन्ही खाती उघडण्याची सुविधा

या योजनेत सिंगल आणि जॉइंट या दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करता येते. जॉइंट एन्युटीमध्ये, पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या व्यक्तीला आजीवन पेन्शन मिळत राहते.

पेन्शन मिळवण्याचे पर्याय

गुंतवणूकदार खालील आधारांवर पेन्शन निवडू शकतो:

मासिक (Monthly) – ₹1,000 किमान
त्रैमासिक (Quarterly) – ₹3,000 किमान
सहामाही (Half-yearly) – ₹6,000 किमान
वार्षिक (Yearly) – ₹12,000 किमान

गुंतवणूक रक्कम आणि लाभ

किमान गुंतवणूक: ₹1,00,000
अधिकतम मर्यादा: कोणतीही मर्यादा नाही
जितकी जास्त गुंतवणूक, तितकी जास्त पेन्शन
18 ते 100 वर्षांपर्यंत वयोगटातील कोणीही गुंतवणूक करू शकतो
3 महिन्यानंतर लोन सुविधा उपलब्ध

तत्काळ पेन्शनचा पर्याय

ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे, म्हणजे एकदाच संपूर्ण रक्कम भरावी लागते. काही पर्यायांमध्ये तत्काळ पेन्शन (Immediate Annuity) घेण्याची सोय आहे.

LIC स्मार्ट पेन्शन योजना कुठे व कशी खरेदी करावी?

ही योजना खालील मार्गांनी खरेदी करता येते:

LIC ची अधिकृत वेबसाइट वरून ऑनलाइन
LIC एजंट, POSP-लाइफ इन्शुरन्स प्रतिनिधी किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC)

नॉमिनीला देखील मिळेल लाभ

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला पेन्शन लाभ मिळत राहतो. योजना निवडताना लाभार्थ्याचे योग्य माहिती नोंदवणे आवश्यक आहे.

हेही वाचा :घरबसल्या मिळवा ‘मोफत वीज’, 2027 पर्यंत 10 कोटी घरांना मोफत वीज देण्याचे सरकारचे लक्ष्य.

Share This Article