Mahadbt Farmer Subsidy Online Apply 2025 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता कृषी यंत्रसामग्री, सिंचन सुविधा, फलोत्पादन, संरक्षित शेती यांसारख्या विविध योजनांचे लाभ घेणे अधिक सुलभ आणि पारदर्शक झाले आहे. राज्य शासनाच्या “महाडीबीटी” (MahaDBT) या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून शेतकरी थेट अर्ज करून अनुदान मिळवू शकतात, आणि हे सर्व पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने शक्य आहे.
महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध केंद्रीय आणि राज्य पुरस्कृत योजना एकत्रित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अर्जप्रक्रिया केंद्रीभूत, पारदर्शक आणि जलद झाली आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढीच कागदपत्रे अपलोड करून घरबसल्या अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर त्याची स्थिती ट्रॅक करता येते आणि अर्जासंबंधी सर्व अपडेट्स SMS आणि ईमेलद्वारे मिळतात. सरकारकडून सर्व योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल जात.
महाडीबीटीवर अर्ज करण्याआधी शेतकऱ्यांनी पोर्टलवरील मार्गदर्शक पुस्तिका वाचावी. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर पारदर्शक लॉटरी प्रणालीद्वारे लाभार्थी निवडले जातात. निवड झाल्यानंतर १० दिवसांत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ३० दिवसांच्या आत खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर खात्री करून अनुदान थेट बँकेत जमा केल जात.
सध्या महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या प्रमुख योजनांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास, आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यांचा समावेश आहे. या योजनांतर्गत सध्या २५% ते १००% पर्यंत अनुदान दिल जात आहे.
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी महाडीबीटीवरील योजनांचा लाभ घेतला आहे. महाडीबीटीवरील शेतकरी योजनांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्जासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login या संकेतस्थळाला भेट द्या.
🔴 हेही वाचा 👉 आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवली, CBDT चा मोठा निर्णय.