या योजनेत मोठा बदल! अनुदानात २५% वाढ; आता मिळणार २५,००० रुपये

2 Min Read
Maharashtra Kanyadan Yojana Amount Increased 2025

Maharashtra Kanyadan Yojana Amount Increased 2025 : राज्यातील मागासवर्गीय घटकातील सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने ‘कन्यादान योजने’त बदल करत अनुदानाची रक्कम तब्बल २५ टक्क्यांनी वाढवली असून, आता प्रतिजोडप्यास ₹२५,००० पर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांना लाभ दिला जातो.

कन्यादान योजना राज्य शासनाने २००३-०४ मध्ये सुरू केली होती. सुरुवातीला योजनेनुसार प्रतिजोडप्यास ₹१०,००० देण्यात येत होते, ज्यामध्ये मंगळसूत्रासाठी ₹६,००० आणि संसारोपयोगी वस्तूंकरिता ₹४,००० इतका समावेश होता. यानंतर २०१६ मध्ये ही रक्कम वाढवून ₹२०,००० करण्यात आली होती. त्याचवेळी स्वयंसेवी संस्थांना ₹४,००० चे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली होती.

आता, महिला व बालविकास विभागाच्या शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या धर्तीवर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कन्यादान योजनेंतर्गत एकसंधता राखण्यासाठी ही मदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. सरकारच्या नवीन निर्णयानुसार, सामूहिक विवाहात सहभागी होणाऱ्या प्रतिजोडप्यांना ₹२०,००० ऐवजी आता ₹२५,००० अनुदान दिले जाणार आहे, तर स्वयंसेवी संस्थांसाठी पूर्वीप्रमाणेच ₹४,००० ची रक्कम कायम राहणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी १०० जोडप्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचही शासनाकडून स्पष्ट करण्यात आल आहे. राज्य शासनाचा हा निर्णय मागासवर्गीय समुदायाच्या सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाच पाऊल मानल जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 अर्ज करण्यापूर्वी पात्रता जाणून घ्या; ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळे निकष.

Share This Article