Maharashtra Kukutpalan Karj Yojana Loan Subsidy : राज्यातील बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची नवी वाट खुली झाली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक अशी योजना जाहीर केली आहे, जिच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळणार असून पोल्ट्री फॉर्मसारखे व्यवसाय करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. अनेक जण याबाबत माहिती घेत आहेत, तर काहींनी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
सरकारच्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अत्यल्प व्याजदरात कर्ज मिळणार असून, काही प्रकरणांमध्ये अनुदानाचाही लाभ दिला जाणार आहे. ही संधी केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही, तर ग्रामीण भागातील इच्छुक युवकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून शासनाचा उद्देश ग्रामीण स्तरावर अधिकाधिक रोजगार निर्माण करणे आणि पारंपरिक शेतीव्यवसायाला जोड व्यवसायांचा आधार देणे आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.
Maharashtra Kukutpalan योजनेविषयी महत्त्वाची माहिती:
योजनेचे नाव: महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना
लाभ: ५०,००० ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज
व्याजदर: बँकेनुसार सवलतीचे
परतफेड कालावधी: ५ ते १० वर्षे
पात्रता: महाराष्ट्रातील कोणताही नागरिक
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट साईझ फोटो
व्यवसाय योजना अहवाल
बँक पासबुक झेरॉक्स
पोल्ट्री फार्म परवानगी
उपकरणे खरेदीची बिले
विमा दस्तऐवज
अर्ज करण्याची पद्धत:
१. जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या.
२. बँकेकडून अर्जाचा फॉर्म मिळवा.
३. आवश्यक माहिती भरून कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा.
४. पात्रता असल्यास तुमचे कर्ज मंजूर होईल.
टीप:
अधिकृत अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी आपल्याला स्थानिक बँकेशी संपर्क करणे गरजेचे आहे. लवकर अर्ज करा आणि या संधीचा लाभ मिळवा.
🔴 हेही वाचा 👉 कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २५ माद्या व ३ नर कोंबड्यांचे वाटप होणार.