Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Stopped: ‘या’ जिल्ह्यातील सुमारे १ लाख लाडक्या बहिणींचा लाभ रखडला

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Stopped

Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Stopped : सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ११ लाख महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत दरमहा १५०० रुपये प्रमाणे आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र सध्या सुमारे १ लाख महिलांचा अकरावा हप्ता थांबवण्यात आला आहे, ज्यामुळे संबंधित महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कोणाचा लाभ थांबवला?

राज्य शासनाच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये खालील महिलांचा लाभ थांबवण्यात आल्याचे समजते:

चारचाकी वाहनधारक महिला
संजय गांधी निराधार योजना लाभार्थी
इतर सरकारी योजनांचे लाभार्थी
शेतकरी सन्मान निधी मिळणाऱ्या महिला

समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांचे उत्पन्न व पात्रतेच्या आधारावर नव्याने पडताळणी करून अकरावा हप्ता रोखण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता कधी येणार?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. आणि याबद्दलची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

योजना का सुरू करण्यात आली?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत देऊन स्वयंपूर्ण बनवणे हा आहे. यामुळे महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळत असून, त्याचा घरखर्च, मुलांचे शिक्षण, व वैद्यकीय गरजांसाठी उपयोग होतो.

महत्वाचे: जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही पात्र असूनही तुमचा हप्ता थांबला असल्याचे तुमच्या निदर्शनास आले, तर तुमच्या पात्रतेची खात्री करा व नजीकच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा किंवा अधिकृत पोर्टलवर तुमची माहिती तपासा.

🔴 हेही वाचा 👉 फसवणुकीपासून स्वतःला वाचवायचंय? मग लगेच अस करा ‘आधार’ लॉक.

Share This Article