लाडक्या बहिणींना मे आणि जूनचे ३,००० रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता; अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित Ladki Bahin Yojana 11th Installment Update

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Update

मुंबई | ३१ मे २०२५: Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Update – महाराष्ट्रातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत मे महिन्याचे १,५०० रुपये अद्याप जमा झाले नाहीत, त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार मे आणि जून महिन्याचे मिळून एकत्रित ३,००० रुपये जूनच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

तथापि, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या एकूण १० हप्ते वितरित करण्यात आले असून लाभार्थी महिला ११ व्या हफ्त्याच्या (May Installment) प्रतिक्षेत आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment | जूनमध्ये एकत्रित जमा होणार?

स्थानिक अहवालांनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मे व जूनचे मिळून ३,००० रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वट पौर्णिमा या सणानिमित्त हा हप्ता दिला जाऊ शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
हा हप्ता नेमका कधी येणार, याबाबत लवकरच महिला व बालविकास मंत्री अधिकृत माहिती देतील, अशी अपेक्षा आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

‘माझी लाडकी बहिण योजना’ ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांसाठी आहे. या योजनेतून पात्र लाभार्थींना दरमहा १,५०० रुपये अनुदान देण्यात येते. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे १० हप्ते वितरित झाले असून, मे महिन्यासाठी ११ वा हप्ता देय आहे.

अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीची कारवाई

लाडकी बहीण योजनेतून २,६५२ शासकीय कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर लाभ घेतल्याचे उघडकीस आले असून, शासनाने त्यांच्या विरोधात ३.५८ कोटी रुपयांची वसुली मोहीम सुरू केली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा : पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य शासनाचा नवा निर्णय लागू.

Share This Article