Ladki Bahin Yojana Loan: लाडक्या बहिणींना मिळणार ₹40,000 कर्ज – हफ्ते फेडण्याची गरज नाही

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Loan Benefits 2025

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Loan Benefits 2025 : राज्यातील महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ‘माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा मिळणाऱ्या ₹1500 च्या आर्थिक मदतीबरोबरच आता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹40,000 पर्यंत कर्जाचीही सुविधा दिली जाणार आहे.

2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आली. आतापर्यंत योजनेच्या 10 हप्त्यांचे वाटप पूर्ण झाले असून, 11वा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे.

महिलांना मिळणार 40,000 रुपये कर्ज:

नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी घोषणा केली की, योजनेतील पात्र महिलांना बँकेकडून 40,000 रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. या कर्जाचा महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोग होईल. हे कर्ज ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’च्या (DBT) माध्यमातून दिले जाईल आणि महिलांच्या 1500 रुपयांच्या नियमित सहाय्यातूनच त्याचे हप्ते फेडून घेतले जातील, त्यामुळे महिलांवर हफ्ते फेडण्याचा कोणताही आर्थिक ताण येणार नाही.

कर्जासाठी आवश्यक अटी:

अर्जदार महिला 21 ते 65 वर्षे वयोगटातील असावी
महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे
अर्जदाराच्या कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीत नसावे किंवा कुटुंबाकडे कार नसावी
महिलेने लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त अन्य कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा

11व्या हप्त्याची तारीख:

मे महिन्याच्या अखेरीस 11वा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये कुणाला ‘आयुष्मान कार्ड’ मिळू शकत नाही? योजनेच्या पात्रता अटी जाणून घ्या.

Share This Article