मुंबई | ४ जून २०२५: Majhi Ladki Bahin Yojana May Payment Update 2025 — महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत मे महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
दोन दिवसांत सर्व लाभार्थ्यांना निधी मिळणार
अदिती तटकरे यांच्या म्हणण्यानुसार, येत्या २ दिवसांत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये सन्मान निधी जमा होईल. लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
योजनेची दमदार वाटचाल सुरूच राहणार
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना राज्यातील गरजू व पात्र महिलांना मासिक सन्मान निधीच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेमुळे अनेक महिलांना स्वाभिमानाने आणि आर्थिक स्थैर्याने जगण्यासाठी हातभार लागतो आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात आता सुरु करता येणार दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय; या आहेत अटी.