Mini Tractor Yojana 2025 Maharashtra : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत (Social Welfare Department) राबविण्यात येणाऱ्या Mini Tractor Yojana अंतर्गत आता स्वयंसहाय्यता बचत गटांना ९०% पर्यंत शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळू शकतात. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा, कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे.
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोण आहेत पात्र?
मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी खालील पात्रता निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे:
स्वयंसहाय्यता बचत गटातील अध्यक्ष, सचिव व किमान ८०% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील असावेत.
सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक.
अर्ज स्वयंसहाय्यता बचत गटातर्फे करण्यात यावा.
किती मिळणार अनुदान?
या योजनेतर्गत ९ ते १८ HP (अश्वशक्ती) क्षमतेच्या मिनी ट्रॅक्टरसह त्याची उपसाधने जसे की:
कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर.
ट्रेलर.
या साधनांच्या खरेदीसाठी रु. ३.५ लाख मर्यादेपर्यंत ९०% अनुदान, म्हणजेच कमाल रु. ३.१५ लाख इतके शासकीय अनुदान देण्यात येते.
अर्ज कसा कराल?
अर्ज सादर करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: ३० जून २०२५ आहे.
अर्ज कार्यालयीन वेळेत आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.
योजनेचा उद्देश
Mini Tractor Yojana शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन कृषी उत्पादन वाढवणे, स्वावलंबन निर्माण करणे, आणि उत्पन्नवाढीस चालना देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
हेही वाचा : २०वा हप्ता या तारखेला जमा होण्याची शक्यता, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ.