PM Awas Yojana News: मध्यमवर्गीयांना दिलासा; 75,000 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार घर खरेदीसाठी सबसिडी

2 Min Read
PM Awas Yojana 75000 Salary Home Subsidy Scheme 2025

PM Awas Yojana Latest News : शहरी भागात घर खरेदी करण हे मध्यमवर्गीयांसाठी मोठ स्वप्न असत. वाढती महागाई आणि घरांच्या किंमती लक्षात घेता, अनेकांना आपल स्वतःच घर घेण कठीण जात. मात्र आता केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना (PMAY) या योजनेअंतर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे, जो मासिक 75,000 रुपये पर्यंत पगार असलेल्या नोकरदार वर्गासाठी अत्यंत दिलासादायक आहे.

या योजनेच्या नव्या स्वरूपानुसार, 75,000 रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या लोकांना घर खरेदीसाठी अनुदान (सबसिडी) मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही योजना शहरांमध्ये मध्यमवर्गीयांसाठी 1 कोटी नवीन घरे बांधण्याच्या उद्देशाने राबवली जाणार आहे. त्यामुळे यापुढे फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच नाही, तर सामान्य नोकरदार वर्गालाही सरकारच्या घर अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ही पूर्वी फक्त EWS (Economically Weaker Sections) आणि LIG (Lower Income Group) श्रेणीतील लोकांसाठी मर्यादित होती. पण आता सरकारने MIG (Middle Income Group) वर्गालाही यात समाविष्ट केल आहे. त्यामुळे घर खरेदी करताना मिळणाऱ्या सबसिडीमुळे EMI च ओझ लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे.

सुधारित आवास योजना योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्याच्या नावावर आधीपासून कोणतेही घर नसणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि त्याच नियमित उत्पन्न असण गरजेच आहे. योजनेचा लाभ घेतल्यास घर खरेदी करताना बँकांकडून मिळणाऱ्या गृहकर्जावर सरकारकडून ठराविक टक्के व्याज सबसिडी स्वरूपात दिली जाते.

शहरांमध्ये वाढत्या घरांच्या मागणीकडे लक्ष देत, सरकारने पुढील काही वर्षांत 1 कोटी नवीन घरे बांधण्याच लक्ष ठेवल आहे. त्यामुळे घर घेण्याच स्वप्न पाहणाऱ्या लाखो मध्यमवर्गीयांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 दहावी व बारावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; १५ जूनपर्यंत करा अर्ज.

Share This Article