PM Awas Yojana Eligibility Documents Apply Process : पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) एक मोठी संधी आहे. केंद्र सरकारच्या या योजनेतून गरजू लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील लाभार्थ्यांसाठी लागू आहे. पण अर्ज करण्यापूर्वी काही महत्वाच्या पात्रता अटी जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, अर्ज नाकारला जाऊ शकतो.
शहरी भागासाठी पात्रता
अर्जदाराचे पक्के घर नसावे.
EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा कमी असावे.
LIG (निम्न उत्पन्न गट) – उत्पन्न ₹3 लाख ते ₹6 लाख दरम्यान असावे.
MIG-1 (मध्यम उत्पन्न गट) – उत्पन्न ₹6 ते ₹9 लाख दरम्यान असावे.
झोपडपट्टीत राहत असलेले, पण ज्यांच्याकडे पक्के घर नाही, असे लोकही पात्र आहेत.
ग्रामीण भागासाठी पात्रता
अर्जदाराचे नाव SECC (सामाजिक-आर्थिक व जातीय जनगणना) डेटामध्ये असणे आवश्यक आहे.
ज्यांच्याकडे फक्त कच्चे घर आहे किंवा घरच नाही, ते अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
शपथपत्र (घर नसल्याचे)
आधार कार्ड
मनरेगा जॉब कार्ड
बँक खाते तपशील
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागतो किंवा संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो.
पिएम आवास योजना ही स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी दिलासा ठरत आहे.
🔴 हेही वाचा 👉 आता OTP शिवाय मोबाइल नंबर बदलण शक्य, जाणून घ्या प्रक्रिया.