PM Awas Yojana Phase One Completion Directive : राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे काम (Gharkul Yojana) प्रगतीपथावर आणण्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यातील उर्वरित घरे तातडीने पूर्ण करावीत आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रलंबित प्रकरणांना त्वरित प्रशासकीय मान्यता द्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांची सखोल तपासणी केली.
मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले की, जे लाभार्थी स्थलांतरित झाले आहेत, त्यांची नावे घरकुल यादीतून वगळावीत आणि त्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव घेतला जावा. जमीन नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली जावी. योजनेतून मिळणारे २८ हजार रुपये व इतर लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी स्थानिक यंत्रणांनी सजग राहाव, अस त्यांनी बजावल.
ग्रामविकास मंत्रालयाच्या पुढील धोरणांबाबत माहिती देताना त्यांनी “मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना” लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. ही योजना तीन महिन्यांची स्पर्धात्मक असून, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर गौरवण्यात येणार आहे. या योजनेसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समर्पितपणे काम करावे, असे आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
त्याचबरोबर ग्रामपंचायती नसलेल्या गावांची माहिती आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच काही गावांमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या मागणीसंदर्भात प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
🔴 हेही वाचा 👉 ११वी प्रवेश प्रक्रिया अपडेट! महत्त्वाच्या तारखा, प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना.