PM Awas Yojana Status Check Online : प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असून, ती देशातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर देण्याच्या उद्देशाने राबवली जाते. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर गरीब कुटुंबांना या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांकडे स्वतःच पक्क घर नसण आवश्यक आहे. अर्जदारांची आर्थिक स्थिती आणि काही विशिष्ट पात्रता निकष पूर्ण असनही आवश्यक आहे.
पिएम आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात 92.61 लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. सरकारने यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे जे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांनी नुकताच अर्ज केला आहे, त्यांच्यासाठी स्टेटस तपासण महत्त्वाच आहे.
जर तुम्ही PM आवास योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमच नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासायच असेल, तर तुम्ही सहजपणे ऑनलाईन पद्धतीने स्टेटस पाहू शकता. त्यासाठी PMAY च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://pmaymis.gov.in) जाव लागेल. आणि तेथील ‘Citizen Assessment’ या मेनूतील पर्यायांद्वारे तुम्ही नाव, मोबाइल नंबर किंवा Assessment ID च्या आधारे तुमचा अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे हे जाणून घेऊ शकता.
योजनेअंतर्गत स्टेटस तपासताना अर्ज क्रमांक नसेल तरी नाव, वडिलांच नाव, राज्य, जिल्हा आणि शहर याच्या आधारे माहिती मिळू शकते. जर अर्ज क्रमांक असेल, तर त्याचा वापर करून अधिक अचूकपणे स्टेटस पाहता येते. तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे की नाही, तो प्रक्रियेत आहे का, याचा तपशील यामार्फत तपासू शकता.
🔴 हेही वाचा 👉 लग्नानंतर वडिलांच्या संपत्तीत मुलीला किती हिस्सा मिळतो? कायदा काय सांगतो जाणून घ्या.