PM Kisan 20th Installment Date Ekyc Issue Beneficiary Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत १९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, आता सर्वांना २०व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार, २०वा हप्ता जून २०२५मध्येच जमा होण्याची शक्यता आहे.
PM Kisan 20th Installment Date
पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्याचे वितरण सुमारे चार महिन्यांच्या अंतराने केले जाते. उदाहरणार्थ,
१७वा हप्ता – जून २०२४
१८वा हप्ता – ऑक्टोबर २०२४
१९वा हप्ता – फेब्रुवारी २०२५
या क्रमाने पाहता, २०वा हप्ता जून २०२५मध्येच जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणेसाठी लाभार्थ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता?
काही तांत्रिक व प्रशासनिक कारणांमुळे काही शेतकऱ्यांना २०वा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामागची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे:
- ई-केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी
PM किसान योजनेत ई-केवायसी (eKYC) सक्तीची आहे. ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केलेली नाही, त्यांचा हप्ता रोखला जातो. हे काम ऑनलाइन पोर्टलवर किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन करता येते.
- भू-सत्यापन (Land Verification) अपूर्ण
राज्य सरकारमार्फत करण्यात येणारे भू-सत्यापन जर शेतकऱ्यांनी अद्याप पूर्ण केले नसेल, तर त्यांचाही हप्ता अडकू शकतो.
- बँक खात्याशी आधार लिंक नसणे
शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे. आधार लिंक नसल्यास सरकारकडून DBT (Direct Benefit Transfer) होत नाही.
- DBT ऑन नसणे
काही शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यात DBT सुविधा सक्रिय केलेली नसते, त्यामुळे हप्त्याची रक्कम ट्रान्सफर होऊ शकत नाही.
काय करावे?
जर शेतकऱ्यांनी वरील प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेल्या नसतील, तर लवकरात लवकर त्या पूर्ण कराव्यात. त्यासाठी नजीकच्या बँक शाखा, CSC सेंटर किंवा pmkisan.gov.in या पोर्टलवर भेट देणे आवश्यक आहे.
हेही वाचा : कोणाला उघडता येत ‘जन धन’ योजना बँक खात? जाणून घ्या पात्रता, प्रक्रिया आणि फायदे.