तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? अशा पद्धतीने तपासा, लवकरच जाहीर होणार २०व्या हप्त्याची तारीख PM Kisan Yojana 20th Installment

2 Min Read
PM Kisan Yojana 20th Installment Status Check

PM Kisan Yojana 20th Installment Status Check : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN). या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक सहाय्य म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. हे पैसे २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. शेतकरी आता या योजनेच्या २०व्या हप्त्याची (20th Installment) प्रतीक्षा करत आहेत.

पिएम किसान योजनेचा २०वा हफ्ता कधी येणार?

पिएम किसान योजनेच्या नियमांनुसार प्रत्येक हप्त्याचा कालावधी साधारणतः चार महिन्यांचा असतो. १९वा हप्ता फेब्रुवारीमध्ये दिला गेला होता, त्यामुळे २०व्या हप्त्याची रक्कम जून २०२५ मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हप्त्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कार्यक्रमाद्वारे करतात आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे रक्कम जमा केली जाते.

तुमच्या खात्यात पैसे जमा होणार की नाही? अस तपासा स्टेटस

तुम्हाला पिएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे की नाही हे तपासण्यासाठी PM Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर स्टेटस तपासणे गरजेचे आहे.

स्टेटस कस चेक करायच?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmkisan.gov.in
  2. वेबसाईटवरील “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करा
  3. आपला PM-Kisan नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका
  4. कॅप्चा कोड भरा आणि “Get Data” बटणावर क्लिक करा
  5. तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल

पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे, भू-अभिलेख अद्ययावत ठेवणे, व आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

PM-KISAN योजनेचे फायदे

थेट बँक खात्यात रक्कम
शेतकऱ्यांना आधारभूत आर्थिक मदत
डिजिटल आणि पारदर्शक प्रक्रिया
कोणत्याही राज्यातील पात्र लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना लाभ मिळतो


शेतकऱ्यांसाठी PM-KISAN योजना मोठा आधार बनली आहे. २०वा हफ्ता लवकरच जाहीर होणार आहे. तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी असाल, तर आपल्या स्टेट्सची खातरजमा करून घ्या आणि जर काही अडचण असेल तर तात्काळ सुधारणा करा.

🔴 हेही वाचा 👉 आदिशक्ती अभियानाच्या माध्यमातून महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती.

Share This Article