PM Kisan Yojana Fraud Alert : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी 6 हजार रुपये थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. या रकमेचे तीन समान हप्ते (Installment) दिले जातात. परंतु, सध्या काही फसवणूक करणारे लोक PM किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लक्ष्य करत असून, शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्याआधारे त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.
शेतकऱ्यांना फसवे फोन कॉल, बनावट लिंक आणि ई-केवायसी करण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली जात आहे. “तुमच भू-सत्यापन झालेल नाही, तुमच खात बंद होईल” किंवा “ई-केवायसी न केल्यास पुढचा हप्ता थांबवण्यात येईल” अशा आशयाचे फोन कॉल करून शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती मिळवली जाते आणि नंतर त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढले जातात.
फसवणुकीची सामान्य पद्धत काय आहे?
फेक कॉल्स: काहीजण शासकीय कर्मचारी असल्याचे भासवून कॉल करतात आणि ई-केवायसी अथवा भू-सत्यापनाच्या नावाखाली माहिती मागतात.
बनावट लिंक: शेतकऱ्यांना मेसेज किंवा व्हॉट्सअॅपवर बनावट लिंक पाठवल्या जातात ज्या वर क्लिक केल्यास फोन हॅक होतो किंवा बँक डिटेल्स चोरली जातात.
भीती दाखवून माहिती मिळवण: “तुमच नाव यादीतून काढल जाईल” अस सांगून घाईघाईत माहिती मागितली जाते.
शेतकऱ्यांनी काय कराव?
फक्त अधिकृत वेबसाइटचा वापर करा: pmkisan.gov.in हीच पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट आहे. याशिवाय पिएम किसान योजनेची दुसरी कोणतीही वेबसाईट नाही.
CSC सेंटर मध्ये ई-केवायसी करा: जर ई-केवायसी करायची असेल तर आपल्या गावातील अधिकृत CSC सेंटरला भेट द्या.
कोणालाही तुमची माहिती देऊ नका: आधार नंबर, बँक डिटेल्स, ओटीपी इत्यादी माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका.
सरकारने दिलेल्या सूचना
केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून वारंवार इशारा दिला जात आहे की, कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अधिकृत माध्यमांचाच वापर करावा. बनावट कॉल, ईमेल, मेसेज याबाबत त्वरित स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करावी.