PM Kisan Yojana Namo Shetkari Yojana Installment Update 2025 Maharashtra : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत पुढील म्हणजेच 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
यासोबतच राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून देखील PM-Kisan लाभार्थ्यांना अतिरिक्त 6000 रुपये दिले जातात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपयांचा लाभ मिळतो.
या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे, भूधारणा माहिती अद्ययावत असणे आणि बँक खाते आधारशी लिंक असणे या अटींचा समावेश आहे. ही कामे पूर्ण केल्यास हप्ता वेळेवर मिळेल.
राज्यात लाखो शेतकरी या योजनांसाठी पात्र आहेत. त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आधीचे हप्ते वेळेवर मिळाले असून, त्यांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसानचा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर लगेचच राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्याची रक्कमही वितरित केली जाईल.
शेतकऱ्यांनी वेळेवर लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी, बँक खाते आणि जमीन नोंदणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
🔴 हेही वाचा 👉 ₹10 आणि ₹20 च्या नोटा व नाणी बंद? अर्थ मंत्रालयाचा लोकसभेत मोठा खुलासा.