PM Kusum Yojana: आता सरकार देत आहे ७५% सबसिडी, वीज विकून करा लाखोंची कमाई

2 Min Read
PM Kusum Yojana Maharashtra Solar Pump Subsidy 2025

PM Kusum Yojana Solar Pump Subsidy 2025 : शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतात पाणी देण्यासाठी वीजेची अपुरी उपलब्धता, डिझेलचा वाढता खर्च आणि वाढत्या वीज बिलांच्या समस्येला कायमचा रामराम म्हणायची वेळ आली आहे. कारण केंद्र सरकारच्या पिएम कुसुम योजनेमुळे आता शेतकऱ्यांना सोलर पंप लावण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळतेय आणि याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कमाईतही चांगलीच वाढ होत आहे.

PM Kusum Yojana Maharashtra काय आहे?

केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना सोलर पंपसाठी एकूण ७५% पर्यंत सबसिडी देतात. उर्वरित २५% रक्कम शेतकऱ्यांना स्वत: भरावी लागते किंवा बँकेकडून कर्ज स्वरूपात घेता येते. एवढच नाही, तर या सोलर पंपवर विमा संरक्षण देखील दिल जात. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र सौरऊर्जा उपलब्ध होते आणि त्यांच्यावर वीज किंवा डिझेलवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही.

वीज विकून कमाईची मोठी संधी

फक्त सिंचनच नाही, तर जर एखाद्या शेतकऱ्याकडे मोकळी किंवा बंजर जमीन असेल, तर तिथे सोलर पॅनेल प्रोजेक्ट उभा करून तो सरकारला वीज विकू शकतो. एक मेगावॉट सोलर प्रोजेक्टसाठी सुमारे ४ ते ५ एकर जमीन लागते, आणि त्यातून वर्षाला सुमारे १५ लाख युनिट वीज तयार होते. ही वीज विकून शेतकरी लाखोंची कमाई करू शकतात.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
रेशन कार्ड
बँक पासबुकची झेरॉक्स
पासपोर्ट साइज फोटो
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
शेतजमिनीची कागदपत्रे

अर्ज कुठे करायचा?

PM Kusum योजनेसाठी प्रत्येक राज्याची स्वतंत्र वेबसाइट आहे. यपजनेबद्दल सविस्तर माहिती https://pmkusum.mnre.gov.in/#/landing या केंद्र सरकारच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

हेही वाचा: आधार कार्ड अजूनही अपडेट केल नाही? मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी गमावू नका.

Share This Article