PM Shram Yogi Mandhan Yojana Required Documents : असंघटित क्षेत्रातील कामगार, मजूर यांच्यासाठी आर्थिक स्थैर्य देणारी योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’. या योजनेसाठी नोंदणी करून कामगार वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा ₹3,000 पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. मात्र, अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्याबद्दल जाणून घेऊयात…
देशातील कोट्यवधी मजूर आजही असंघटित क्षेत्रात काम करतात. या कामगारांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेत सहभागी होऊ शकतो, आणि त्यासाठी त्याला आपल्या वयावर आधारित मासिक प्रीमियम भरावा लागतो.
श्रम योगी मानधन योजनेनुसार, अर्जदाराने 60 वर्षांपर्यंत नियमितपणे मासिक योगदान द्यावे लागते. त्यानंतर, त्याला या योजनेअंतर्गत दर महिन्याला ₹3,000 पेन्शन दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
ओळखपत्र (जसे की पॅन कार्ड/मतदार ओळखपत्र)
मोबाइल नंबर
पत्रव्यवहाराचा पत्ता
उत्पन्नाचा पुरावा
या कागदपत्रांच्या आधारेच अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते. जर कोणतीही माहिती अपुरी असेल, तर तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
महत्त्वाचे:
मानधन योजना खास करून अशा नागरिकांसाठी आहे जे कोणत्याही EPFO किंवा इतर पेन्शन योजनेखाली नोंदणीकृत नाहीत. या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी कामगार CSC केंद्र किंवा जवळच्या नोंदणीकृत सेवाकेंद्रात जाऊ शकतात.
हेही वाचा : 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा मोठा खुलासा.