PM Ujjwala Yojana 2025 Documents Required : पारंपरिक इंधनाच्या धुरामुळे महिलांचे आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही धोक्यात येते, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आता अधिक व्यापक होत आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांना मोफत एलपीजी गॅस सिलेंडर दिला जातो. यामुळे महिलांना स्वच्छ इंधनावर स्वयंपाक करण्याची सुविधा मिळते आणि त्यांचा वेळ, श्रम व आरोग्याचे संरक्षण होते.
पिएम उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अत्यावश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. ही कागदपत्रे नसतील, तर तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज करताना ही माहिती लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे.
आवश्यक कागदपत्रे:
बीपीएल कार्ड (BPL Card)
आधार कार्ड
वयाचा पुरावा (Age Proof)
पासपोर्ट साइज फोटो
मोबाईल नंबर
बीपीएल यादीतील नावाची प्रिंट
बँक पासबुकची झेरॉक्स
रेशन कार्ड
PM Ujjwala Yojana कोणासाठी आहे?
फक्त महिलांसाठी: पुरुष या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
18 वर्षांपेक्षा जास्त वय: अर्ज करणाऱ्या महिलांचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
आधीपासून गॅस कनेक्शन नसणे: ज्यांच्याकडे आधीपासून गॅस कनेक्शन आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
PM Ujjwala योजनेसाठी अर्ज कसा करावा?
PM Ujjwala योजनेसाठी अर्ज करण्यासाठी या सरकारी संकेतस्थळाला भेट द्या. तिथे “Apply for New Ujjwala Connection” हा पर्याय निवडून, आवश्यक माहिती भरून, कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
देशभरातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जर तुम्ही पात्र असाल तर — योग्य माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज करा आणि पिएम उज्ज्वला योजनेचा लाभ घ्या.
🔴 हेही वाचा 👉 सेव्हिंग आणि करंट बँक अकाउंटमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या सविस्तर माहिती.