PM Ujjwala Yojana Free Gas Connection : देशातील ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील महिलांना धुरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची (PM Ujjwala Yojana) सुरूवात केली होती. पारंपरिक इंधनाचा वापर करत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन आणि पहिला गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देते.
अनेक महिलांना अजूनही या योजनेची संपूर्ण माहिती नाही, विशेषतः योजनेसाठी पात्रता काय आहे हे अनेकांना ठाऊक नसते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम महिलांनी पात्रतेच्या अटी समजून घेणे आवश्यक आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ फक्त महिलांसाठी आहे. पुरुषांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही. महिलांची वयोमर्यादा किमान 18 वर्ष असावी लागते आणि त्या महिला बीपीएल (गरीबी रेषेखालील) कुटुंबातील असाव्यात.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी घरामध्ये आधीपासून एलपीजी गॅस कनेक्शन नसणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करताना आधार कार्ड, पत्ता पुरावा, बँक खाते तपशील, आणि संबंधित राज्य सरकारने जारी केलेले रेशन कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता असते. ही सर्व कागदपत्रे नसल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी https://www.pmuy.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज प्रक्रिया खूप सोपी असून, पात्र लाभार्थींना योजनेचा सहज लाभ मिळवता येतो. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा फायदा घेतला असून त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून आला आहे. स्वच्छ इंधनामुळे आरोग्य महिलांचे सुधारले असून, धुरामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही कमी झाले आहे.
🔴 हेही वाचा 👉 पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला किती संपत्ती मिळते? कायदा काय सांगतो? जाणून घ्या.