PM Vidyalakshmi Yojana: विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची योजना! मिळवा १० लाखांपर्यंत शिक्षण कर्ज, कोणत्याही हमीशिवाय आणि व्याज सवलतीचा लाभ

2 Min Read
PM Vidyalakshmi Yojana Education Loan Interest Subsidy 2025

PM Vidyalakshmi Yojana Education Loan Interest Subsidy 2025 : पिएम विद्यालक्ष्मी योजना ही केंद्र सरकारची विद्यार्थ्यांना सुरु करण्यात आलेली विशेष योजना आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हमीशिवाय कर्ज देण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते, तसेच कोर्सच्या कालावधीपर्यंत आणि एक वर्षाच्या मोरेटोरियम कालावधीपर्यंत पूर्ण व्याज सवलतीचा लाभ मिळू शकतो.

पिएम विद्यालक्ष्मी योजनेचे वैशिष्ट्ये:

१० लाखांपर्यंत कर्ज – जामीनदार किंवा कोणत्याही हमीची गरज नाही.
व्याज सवलत (Interest Subsidy) – शैक्षणिक कालावधी आणि नंतर एक वर्षासाठी उपलब्ध.
कर्जाची रक्कम CBDC वॉलेट किंवा ई-वॉचरद्वारे वितरित केली जाईल.
जर ३ महिन्यांत वापर केला नाही, तर रक्कम परत जाईल.
प्रत्येक वर्षी अर्ज सादर करून सवलत सुरू ठेवावी लागेल.

अर्ज कसा करायचा?

  1. कर्ज मंजूर झाल्यानंतर PM Vidyalakshmi Portal वर लॉगिन करा.
  2. ‘Apply for Interest Subvention’ वर क्लिक करा.
  3. माहिती भरा, उत्पन्न दाखला अपलोड करा.
  4. अर्ज सबमिट केल्यानंतर मोबाईल/ईमेलवर पुष्टी संदेश प्राप्त होईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड
पॅन कार्ड
१०वी/१२वी ची गुणपत्रिका
प्रवेश पत्र (Admit Card)
फी स्ट्रक्चर
निवास प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकत नाही?

ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडल आहे (फक्त वैद्यकीय कारण वगळता)
ज्यांच्यावर कारवाई झाली आहे
जे केंद्र/राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत आहेत
मॅनेजमेंट कोट्याद्वारे प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र नाहीत

हेही वाचा : यांना आता बँक खात्यात मिनिमम बॅलन्स शिल्लक ठेवण्याची गरज नाही, नवीन नियम लागू.

Share This Article