या व्यवसायांना सरकारकडून मोठा आधार; १५ हजार रुपये अनुदान, आणि स्वस्त दरात कर्ज PM Vishwakarma Yojana

2 Min Read
PM Vishwakarma Yojana Benefits Details

PM Vishwakarma Yojana Benefits Details : जर तुम्ही सोनार, लोहार, गवंडी, झाडू बनवणारे, न्हावी, मूर्तिकार यांसारख्या पारंपरिक व्यवसायांमध्ये असाल, तर तुम्हाला केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’चा थेट लाभ मिळू शकतो. या योजनेद्वारे तुम्हाला आर्थिक मदत, कौशल्यविकासाचे प्रशिक्षण, टूलकिटसाठी अनुदान आणि अतिशय कमी व्याजदरात कर्ज यांचा लाभ मिळतो.

भारत सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असून या योजनेसाठी १८ पारंपरिक व्यवसायांतील कारागीर पात्र आहेत. या योजनेचा उद्देश पारंपरिक कौशल्यांना चालना देणे आणि अशा व्यवसायांतील कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे.

PM Vishwakarma योजनेतुन काय लाभ मिळतो?

प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपयांचा भत्ता दिला जातो.
१५,००० रुपयांच्या टूलकिट खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
कर्जाची सुविधा :

पहिल्या टप्प्यात ₹१ लाख पर्यंतचे कर्ज अल्प व्याजदरात
पहिले कर्ज फेडल्यास दुसऱ्या टप्प्यात ₹२ लाखांचे अतिरिक्त कर्ज

PM Vishwakarma योजनेसाठी कोण पात्र आहेत?

ही योजना खालील पारंपरिक व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी आहे:

सोनार, लोहार, राजमिस्त्री, मूर्तिकार, कुलूप बनवणारे
न्हावी, धोबी, शिंपी, झाडू/चटई बनवणारे, टूलकिट बनवणारे
टोपल्या, जाळी बनवणारे, बोट तयार करणारे, खेळणी बनवणारे
खाणीतील दगड फोडणारे

अर्ज कसा करायचा?

  1. जवळच्या CSC सेंटरला भेट द्या
  2. तेथे तुमची पात्रता तपासली जाते
  3. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते
  4. सर्व काही योग्य असल्यास तुमचा ऑनलाइन अर्ज सादर केला जातो

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना केवळ आर्थिक आधार न देता व्यवसाय वृद्धीसाठी पायाभूत मदत करते. प्रशिक्षणासह मिळणारे टूलकिट व कर्ज व्यवसाय विस्तारासाठी खूप उपयुक्त ठरते.

हेही वाचा : लाडक्या बहिणींना मे आणि जूनचे ३,००० रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता; अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित.

Share This Article