PM Vishwakarma Yojana Eligibility Benefits Apply : पारंपरिक कौशल्यांना नवी दिशा देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा (PM Vishwakarma Kaushal Samman Yojana) मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जात आहे. सप्टेंबर 2023 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून लाखो कारीगरांना आर्थिक व प्रशिक्षणाच्या स्वरूपात मदत मिळाली आहे.
या योजनेसाठी कोण पात्र आहेत?
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा उद्देश पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मदत करणे हा आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि पारंपरिक कौशल्य किंवा हस्तकलेत कार्यरत असलेले लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये खालील व्यवसाय करणारे लोक समाविष्ट आहेत:
मूर्तिकार, दगड कोरणारे
लोहार, कुलूप बनवणारे, शिलाई काम करणारे
न्हावी, धोबी, टोपल्या/चटया/झाडू बनवणारे
सोनार, खेळणी व बाहुल्या बनवण्याचा व्यवसाय करणारे
मासेमारीची जाळी बनवणारे, नाव तयार करणारे आणि ईतर पारंपारिक कारागीर
या योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळतात?
- प्रशिक्षण व स्टायपेंड: लाभार्थ्यांना काही दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षणादरम्यान दररोज ₹500 स्टायपेंड दिला जातो.
- टूलकिटसाठी आर्थिक मदत: प्रत्येक लाभार्थ्याला आवश्यक उपकरणे खरेदीसाठी ₹15,000 पर्यंतची मदत दिली जाते.
- कर्जाची सुविधा: पहिल्या टप्प्यात ₹1 लाख पर्यंतचे कर्ज सुलभ व्याजदरात दिले जाते.
पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ₹2 लाख पर्यंतचे अतिरिक्त कर्ज घेता येते.
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करण्याचे दोन पर्याय आहेत:
- ऑफलाइन अर्ज: जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन अर्ज करता येतो.
- ऑनलाइन अर्ज: https://pmvishwakarma.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Login’ विभागात जाऊन नोंदणी करता येते.
पिएम विश्वकर्मा योजना पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
🔴 हेही वाचा 👉 रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया झाली आणखी सोपी – जाणून घ्या संपूर्ण माहिती.