PMJJBY: दरवर्षी फक्त ₹436 भरून ₹2 लाखांचा विमा; सरकारच्या या लोकप्रिय योजनेबद्दल जाणून घ्या

2 Min Read
Pmjjby 436 Premium 2 Lakh Insurance

Pmjjby 436 Premium 2 Lakh Insurance : भारत सरकारने गरिब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर विमा योजना आहे. या योजनेत दरवर्षी फक्त 436 रुपये प्रीमियम भरून व्यक्तीला 2 लाख रुपयांचा जीवन विमा कव्हर मिळतो.

कोणासाठी आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ १८ ते ५० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक घेऊ शकतात, त्यासाठी संबंधित व्यक्तीचे बँक खाते असण आवश्यक आहे.

या योजनेत सहभागी झाल्यानंतर विमा सुरू झाला कि, दुर्भाग्याने जर विमाधारकाचा मृत्यू झाला, तर नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपये विमारक्कम दिली जाते.

पिएम जीवन ज्योती विमा योजनेची वैशिष्ट्ये

प्रीमियम फक्त ₹436 प्रति वर्ष
विमा रक्कम ₹2 लाख
प्रीमियमची रक्कम ऑटो-डेबिट सुविधेद्वारे बँक खात्यातून दरवर्षी वसूल केली जाते
पॉलिसी कालावधी: १ जून ते ३१ मे
ही एक सरकार पुरस्कृत योजना असल्यामुळे विश्वासार्हता जास्त आहे

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड / ओळखपत्र
बँक पासबुक
पासपोर्ट साइज फोटो
मोबाइल नंबर

पिएम जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पिएम जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होण्यासाठी, आपल्या जवळच्या बँकेला भेट द्या. पिएम जीवन ज्योती विमा योजनेचा अर्ज फॉर्म घ्या आणि अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करा.

निष्कर्ष:
वर्षाला फक्त 436 रुपये इतक्या कमी प्रीमियममध्ये ₹2 लाखांचा विमा मिळण हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अजूनही जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर आजच आपल्या जवळच्या बँकेत जाऊन या योजनेमध्ये सहभागी व्हा.

🔴 हेही वाचा 👉 पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 गुंतवले तर ५ वर्षांने किती परतावा मिळेल?.

Share This Article