Post Office Monthly Income Scheme Joint Investment Benefits : नवरा-बायकोने जर एकत्र पोस्ट ऑफिसच्या ‘मंथली इनकम स्कीम’मध्ये गुंतवणूक केली, तर त्यांना दरमहा ₹9,250 इतकी नियमित पेन्शन मिळू शकते. या योजनेत केलेली गुंतवणूक सुरक्षित असून यावर बाजारातील चढ-उतारांचा काहीही परिणाम होत नाही. विशेषतः निवृत्तीसाठी किंवा स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते.
देशातील अनेक पती-पत्नींनी (संयुक्त) या योजनेचा लाभ घेतला असून ही योजना पोस्ट ऑफिसमार्फत केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालवली जाते. या योजनेत गुंतवणुकीवर सध्या 7.4% वार्षिक व्याज दिल जात, जे दरमहा मिळते.
जर पती-पत्नीने मिळून एकत्र संयुक्त खाते उघडले आणि या योजनेत एकदाच 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्यांना एकत्रितपणे दरमहा ₹9,250 इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळते. दुसरीकडे, जर कुणी सिंगल अकाऊंटद्वारे (पती किंवा पत्नीने एकट्याने) 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्यांना दरमहा ₹5,550 मिळतील.
या योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. तथापि, काही विशेष परिस्थितीत 5 वर्षांपूर्वीच गुंतवलेली रक्कम परत मिळू शकते. या योजनेत गुंतवणूक करताना, बाजाराच्या जोखमीपासून संरक्षण मिळते आणि निश्चित उत्पन्नाची खात्रीही मिळते. आणि हीच या योजनेची सर्वात मोठी ताकद आहे.
ज्यांना दरमहा नियमित उत्पन्न हवय अशा नागरिकांसाठी किंवा गृहिणींसाठी दरमहा नियमित आर्थिक उत्पन्न मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
🔴 हेही वाचा 👉 आनंदाची बातमी! आता मिळणार मोफत वाळू, राज्यभरात अंमलबजावणी सुरू.