पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 गुंतवले तर ५ वर्षांने किती परतावा मिळेल? Post office RD Returns 2025

2 Min Read
Post office RD Returns 2025

Post office RD Returns 2025 : जर तुम्ही दर महिन्याला थोडी-थोडी बचत करून भविष्यासाठी मोठी रक्कम उभी करायचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) स्कीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. सरकारच्या या सुरक्षित योजनेत दरमहा ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 इतकी रक्कम गुंतवल्यास, ५ वर्षांनंतर तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस RD स्कीमची वैशिष्ट्ये:

केंद्र सरकारची लघु बचत योजना म्हणून पूर्ण सुरक्षितता
दरमहा ठराविक रक्कम गुंतवण्याची सोय
तिमाही चक्रवाढ व्याज, सध्या वार्षिक दर 6.7%
लोन व नॉमिनी सुविधा देखील उपलब्ध

किती मिळेल परतावा? (6.7% व्याजदरावर आधारित हिशोब):

₹2000 प्रति महिना गुंतवले तर:

एकूण गुंतवणूक: ₹2000 प्रति महिना (५ वर्षे): ₹1,20,000
मिळणारे अंदाजे व्याज: ₹21,983
मिळणारी एकूण रक्कम: ₹1,41,983

₹3000 प्रति महिना गुंतवले तर:

एकूण गुंतवणूक: ₹3000 प्रति महिना (५ वर्षे) ₹1,80,000
मिळणारे अंदाजे व्याज: ₹32,975
मिळणारी एकूण रक्कम: ₹2,12,975

₹5000 प्रति महिना गुंतवले तर:

एकूण गुंतवणूक: ₹3,00,000
मिळणारे अंदाजे व्याज: ₹54,958
मिळणारी एकूण रक्कम: ₹3,54,958

(टीप: ही मिळणारी एकूण रक्कम सध्याच्या 6.7% व्याजदरावर आधारित आहे. प्रत्यक्ष रक्कमेत थोडाफार फरक संभवतो.)

पोस्ट ऑफिस RD योजनेत गुंतवणूक कशी सुरू करावी?

कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा
फॉर्म भरणे व KYC कागदपत्रे (आधार, पॅन) आवश्यक
कमीत कमी ₹100 पासून RD सुरू करता येते
मुदत – ५ वर्षे (60 महिने)
वेळेवर पैसे भरणे आवश्यक; उशीर झाल्यास दंड लागू शकतो
गरज भासल्यास काही अटींसह अकाऊंट वेळेपूर्वी बंद करता येते

निष्कर्ष:

पोस्ट ऑफिस RD योजना ही जोखीमशून्य आणि शिस्तबद्ध बचतीसाठी सर्वोत्तम योजना आहे. कमी मासिक बचत करूनही तुम्ही ५ वर्षांत मोठी रक्कम जमा करू शकता. खासकरून ज्यांना SIP किंवा शेअर मार्केटसारख्या अनिश्चित पर्यायांपासून दूर राहायच आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसही ही योजना फायदेशीर ठरू शकते.

🔴 हेही वाचा 👉 1 जूनपासून बदलणार हे मोठे नियम; सिलेंडरचे दर, ATM ट्रान्झॅक्शन, FD व्याज दरांवर होणार थेट परिणाम.

Share This Article