PPF Scheme In Marathi : देशातील अनेक मध्यमवर्गीय नागरिक आपली बचत बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतात, पण वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केवळ बँकेत बचत खात्यात पैसे ठेवून काहीही साध्य होत नाही. यासाठी सरकारची एक लोकप्रिय योजना आहे – पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना, जी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानली जाते.
या योजनेत तुमचं पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात, कारण त्यावर कोणताही बाजारभावाचा परिणाम होत नाही. म्हणजे शेअर बाजार कोसळल्यानंतरही तुमच्या पीपीएफ खात्याला कोणताही धोका नाही. त्याचबरोबर, या योजनेत करसवलत आणि चांगला व्याजदर मिळतो.
PPF स्कीमची वैशिष्ट्ये –
वार्षिक व्याजदर: 7.1%
किमान गुंतवणूक: ₹500 वार्षिक
कमाल गुंतवणूक: ₹1.5 लाख वार्षिक
मॅच्युरिटी कालावधी: 15 वर्षे (पुढे 5-5 वर्षांनी वाढवता येतो)
या योजनेत जर तुम्ही दरमहा ₹12,500 बचत केली म्हणजेच वर्षभरात ₹1.5 लाख गुंतवले, तर 25 वर्षांनंतर तुमचे सुमारे ₹1.03 कोटी जमा होऊ शकतात. यात तुमची मूळ गुंतवणूक फक्त ₹37.5 लाख असेल आणि उरलेली ₹65.5 लाख रक्कम ही व्याजाच्या स्वरूपात मिळेल.
PPF खाते तुम्ही जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सहज उघडू शकता. ही योजना खास करून कर-बचत, सुरक्षितता आणि दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय मानली जाते.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर पूर्णतः करमुक्त लाभ मिळतो (EEE दर्जा). त्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मोठा परतावा मिळतो.
जर तुम्हीही पैशांची सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल आणि भविष्यात कोट्यधीश बनण्याच स्वप्न पाहत असाल, तर पीपीएफ योजना तुमच्यासाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे.
हेही वाचा : ‘या’ महिलांचा लाभ रोखला – अदिती तटकरे यांच स्पष्टिकरण.