Ration Card : रेशन कार्डधारकांनो सावधान! ही चूक केली तर बंद होऊ शकत तुमच रेशन कार्ड

2 Min Read
Ration Card Cancellation Reasons

Ration Card Cancellation Reasons : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब नागरिकांना अन्नधान्याची आणि अन्य प्रकारची मदत दिली जाते. या योजनांमध्ये राशन कार्ड महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु, जर तुम्ही राशन कार्डधारक असाल आणि त्याचा वापर नियमित करत नसाल, तर तुमचे राशन कार्ड बंद होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

‘अंत्योदय अन्न योजना’ अंतर्गत केंद्र सरकार गरजूंना मोफत किंवा अनुदानित दरात धान्य उपलब्ध करून देते. यासाठी अधिकृत रेशन दुकानदारांकडून धान्य वितरित केले जाते. मात्र, अनेक वेळा कार्डधारक दीर्घकाळपर्यंत हे धान्य घेत नाहीत. अशा स्थितीत, संबंधित खात्याकडून त्यांचे कार्ड निष्क्रिय समजून रद्द केल जाऊ शकत. जर तुमच रेशन कार्ड रद्द झाल, तरी तुम्ही पुन्हा अर्ज करून पुन्हा ते सुरु करू शकता.

याशिवाय आणखी काही चुकांमुळेही तुमच रेशन कार्ड रद्द होऊ शकत. सर्वप्रथम, प्रत्येक कार्डधारकासाठी आणि कार्डातील प्रत्येक सदस्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास, विभाग तुमच रेशन कार्ड बंद करू शकतो. ई-केवायसीसाठी संबंधित व्यक्तींनी आपल्या जवळच्या रेशन डीलरकडे जाऊन POS मशीनद्वारे ओळख पडताळणी करावी लागते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, फसव्या पद्धतीने रेशन कार्ड मिळवणाऱ्या अपात्र व्यक्तींवर देखील कडक कारवाई केली जाते. जर कोणी अपात्र असूनही चुकीची कागदपत्र वापरून किंवा बनावट माहिती देऊन रेशन कार्ड मिळवले असेल, तर विभाग अशा प्रकरणांची चौकशी करून त्यांच रेशन कार्ड रद्द करू शकतो.

म्हणूनच, जर तुम्ही पात्र असाल आणि नियमितपणे सरकारी दुकानातून रेशन घेत असाल, तर ई-केवायसी पूर्ण करा आणि कोणतीही फसवणूक टाळा. अन्यथा तुमच रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share This Article