PM Kisan Yojana 20th Installment Update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 थेट बँक खात्यात जमा केले जातात. ही रक्कम दर तीन महिन्यांनी ₹2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये मिळते.
फेब्रुवारी 2025 मध्ये 19वा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यामुळे, दरम्यानचा वेळ लक्षात घेता, जून 2025 अखेर किंवा जुलैच्या सुरुवातीस 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
ई-केवायसी अनिवार्य
शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. OTP आधारित ई-केवायसीसाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन ई-केवायसी करणे शक्य नाही, त्यांनी जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक KYC करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता थांबवला जाऊ शकतो.
PM Kisan Yojana लाभार्थी स्टेटस कसे तपासाल?
www.pmkisan.gov.in या पोर्टलवर जा.
उजव्या बाजूला असलेल्या ‘Know Your Status’ वर क्लिक करा.
आपला नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून ‘Get Data’ वर क्लिक करा.
त्यानंतर स्क्रीनवर तुमचा लाभार्थी स्टेटस दिसेल.
PM Kisan Yojana पात्रता
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
त्याच्याकडे शेतीयोग्य जमीन असावी.
फक्त लघु व सीमांत शेतकरी पात्र आहेत.
केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक या योजनेसाठी पात्र नाहीत.
नवीन नोंदणी कशी करावी?
pmkisan.gov.in या वेबसाइटवर ‘New Farmer Registration’ टॅबवर क्लिक करा.
आधार क्रमांक, कॅप्चा आणि इतर माहिती भरा.
अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.
मदतीसाठी संपर्क
PM Kisan योजनेशी संबंधित तक्रार किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी 155261 किंवा 011-24300606 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता.
🔴 हेही वाचा 👉 फक्त 1,000 रुपये भरून पिठाची गिरणी? जाणून घ्या काय आहे योजना.