Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या भविष्याची चिंता सोडा; ही सरकारी योजना आहे, सविस्तर माहिती जाणून घ्या

2 Min Read
Sukanya Samriddhi Yojana Details Benefits

Sukanya Samriddhi Yojana Details Benefits : वाढती महागाई, शिक्षणाचा खर्च आणि मुलींच्या विवाहाच्या तयारीने पालकांची झोप उडवली आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुलीच्या भविष्याची आर्थिक तयारी लवकर सुरू करण गरजेच आहे. यासाठीच भारत सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक उत्तम पर्याय आहे. ही योजना केवळ मुलींसाठी असून मुलींचे शिक्षण, करिअर व विवाहासाठी निधी जमा करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत फायदेशीर मानली जाते.

सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केली आहे. यामध्ये पालक आपल्या 10 वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. एकदा खाते सुरू केल्यावर त्यात 15 वर्षे गुंतवणूक करता येते, आणि हे खाते 21 वर्षांनी पूर्णपणे मॅच्युअर होते. ही योजना मुख्यतः दीर्घकालीन बचतीसाठी आहे.

गुंतवणुकीची रक्कम व परतावा

किमान वार्षिक गुंतवणूक – ₹250
कमाल वार्षिक गुंतवणूक – ₹1.5 लाख
सध्या या योजनेवर 8.2% वार्षिक व्याजदर लागू आहे, जो बाजारपेठेच्या चढउतारांपासून पूर्णतः सुरक्षित असतो.

टॅक्स लाभ

सुकन्या समृद्धी योजना ही EEE (Exempt-Exempt-Exempt) श्रेणीत येते, म्हणजेच:

  1. गुंतवणुकीवर टॅक्स सूट (80C अंतर्गत ₹1.5 लाख पर्यंत)
  2. व्याजावर कर नाही
  3. मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवरही कर नाही

सुकन्या समृद्धी योजना का निवडावी?

संपूर्णतः सुरक्षित – बाजाराच्या जोखमींपासून मुक्त
उच्च व्याजदर – पारंपरिक FD किंवा सेव्हिंग खात्यापेक्षा जास्त परतावा
मुलीच्या भविष्याची शाश्वती – उच्च शिक्षण आणि विवाहासाठी पुरेसा निधी
सरकारी योजना असल्यामुळे विश्वासार्हता जास्त

Sukanya Samriddhi योजनेसाठी खात कुठे आणि कस उघडायच?

सुकन्या समृद्धी योजनेसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत खात उघडू शकता. खात उघडताना जन्म प्रमाणपत्र, पालकांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा आवश्यक असतो.

निष्कर्ष

जर तुम्ही आपल्या मुलीच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्याचा विचार करत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. लवकरच गुंतवणूक सुरु करा, आणि थोड्या-थोड्या बचतीतून मोठा निधी तयार करा.

🔴 हेही वाचा 👉 १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; असा करा अर्ज.

Share This Article