Sukanya Samriddhi Yojana Investment Benefits : सुकन्या समृद्धि योजना (SSY) ही भारत सरकारने 2015 साली सुरू केलेली एक महत्वाकांक्षी बचत योजना आहे, जी खास करून मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक बचत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेचा भाग असलेल्या या योजनेत पालक त्यांच्या 10 वर्षांखालील मुलींसाठी खात उघडू शकतात आणि त्यात नियमितपणे गुंतवणूक करून मुलींच्या उज्वल भविष्यासाठी मोठा निधी जमा करू शकतात.
सुकन्या समृद्धि योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत खाते सुरू केल्यानंतर 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते, तर खात्याची पूर्ण परिपक्वता 21 वर्षांनंतर होते. या कालावधीत गुंतवणुकीवर सध्या 8.2% इतक आकर्षक व्याज मिळत आहे, जे इतर बचत योजनांच्या तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे, ही योजना ‘EEE’ वर्गात मोडते, म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि परतावा या तिन्ही गोष्टी करमुक्त असतात.
सुकन्या समृद्धि योजनेतील गुंतवणूकदारांना आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही योजना अत्यंत फायदेशीर मानली जाते. शिवाय, ही एक सरकारी योजना असल्याने त्यात बाजारातील चढ-उतारांचा धोका नसतो. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलीच्या भविष्याच्या शाश्वतीसाठी ही योजना निवडत आहेत.
सध्या या योजनेची सर्वाधिक लोकप्रियता ग्रामीण भागात दिसून येत आहे, जिथे बचतीची मानसिकता अधिक आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना एक चांगला आर्थिक आधार ठरत आहे.
🔴 हेही वाचा 👉 महसूल विभागाच्या या पाच महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा.