शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान; ४०% ते ५०% पर्यंत अनुदान, येथे करा अर्ज, थेट खात्यात अनुदान Tractor Yojana Maharashtra 2025

2 Min Read
Tractor Yojana Maharashtra 2025 Subsidy

Tractor Yojana Maharashtra 2025 Subsidy – राज्य सरकारने २०२५–२६ या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातीतील तसेच अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि सर्वसाधारण महिलांनाही ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज, थेट खात्यात अनुदान

ट्रॅक्टर खरेदीसाठीचे हे अनुदान महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे वाटप केले जाणार असून, पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येणार असून या योजनेचा मुख्य उद्देश छोट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना शेती यांत्रिकीकरणाच्या लाभांशी जोडणे हा आहे.

कोण किती अनुदानासाठी पात्र?

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प/अत्यल्प भूधारक व सर्वसाधारण महिला शेतकरी:
ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ५०% किंवा ₹1.25 लाखांपर्यंत, जे कमी असेल ते अनुदान
इतर सर्व शेतकरी:
ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ४०% किंवा ₹1 लाखांपर्यंत, जे कमी असेल ते अनुदान

कृषी यांत्रिकीकरण का गरजेच आहे?

राज्यात आणि देशात बैलजोड्यांची संख्या कमी होत असल्याने आणि त्यांचे संगोपन महागड ठरत असल्यामुळे यांत्रिकीकरण अपरिहार्य बनले आहे. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे शेतीची काम वेळेवर आणि कमी खर्चात होतात. जमीन, पाणी, बियाणे, खते यांचा कार्यक्षम वापर शक्य होतो. उत्पादन खर्चात जवळपास ४०% घट आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. मजुरांची कमतरता आणि मजुरीचा खर्चही यामुळे कमी होतो यामुळे कृषी यांत्रिकीकरण गरजेच आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे (Tractor Anudan Yojana Maharashtra) राज्यातील लघु व सीमांत शेतकऱ्यांना शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल आणि शेती अधिक फायदेशीर बनेल, असा सरकारचा विश्वास आहे.

🔴 हेही वाचा 👉 प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती; आता ‘यांची’ नावे घरकुल यादीतून वगळली जाणार.

Share This Article