मुंबई, १८ जून २०२५ : Bank Holidays July 2025 India List — जुलै 2025 मध्ये बँकेसंबंधित कामांची योजना आखताना सावधगिरी बाळगा, कारण या महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, या महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांबरोबरच प्रादेशिक सण-उत्सवांच्या दिवशीही बँका बंद राहतील.
कोठे कोणत्या दिवशी बंद राहतील बँका?
3 जुलै (बुधवार): खर्ची पूजा – अगरतला
5 जुलै (शनिवार): गुरु हरगोबिंद जयंती – जम्मू, श्रीनगर
6 जुलै (रविवार): सर्वत्र रविवारची सुट्टी
12 जुलै (शनिवार): दुसरा शनिवार – सर्व देशभर
13 जुलै (रविवार): सर्वत्र रविवारची सुट्टी
14 जुलै (सोमवार): बेह डेन्खलाम – शिलाँग
16 जुलै (बुधवार): हरेला – देहरादून
17 जुलै (गुरुवार): यू तिरोत सिंह स्मृतिदिन – शिलाँग
19 जुलै (शनिवार): केर पूजा – अगरतला
20 जुलै (रविवार): सर्वत्र रविवारची सुट्टी
26 जुलै (शनिवार): चौथा शनिवार – सर्व देशभर
27 जुलै (रविवार): सर्वत्र रविवारची सुट्टी
28 जुलै (सोमवार): द्रुक्पा त्शे-जी – गंगटोक
जरी डिजिटल बँकिंग सेवा (जसे की UPI, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग) सुरु असले तरी रोख व्यवहार, ड्राफ्ट व इतर शाखा आधारित सेवा बंद असतील. त्यामुळे खातेदारांनी महत्त्वाचे व्यवहार या सुट्ट्यांपूर्वी उरकून घ्यावेत.
हेही वाचा : सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; मात्र हिंदीची सक्ती नाही.