मृत व्यक्तीच PAN कार्ड रद्द करण का आवश्यक आहे? रद्द न केल्यास कायदेशीर अडचणी Pan Card Deceased Person Cancel Guidelines

2 Min Read
Pan Card Deceased Person Cancel Guidelines India

Pan Card Deceased Person Cancel Guidelines India : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे PAN कार्ड (Permanent Account Number) रद्द करणे का गरजेचे आहे, याबाबत अनेकांना माहिती नसते. मात्र आयकर विभागाच्या नियमांनुसार, मृत व्यक्तीच्या PAN कार्डचा गैरवापर झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

मृत्यूनंतरही PAN कार्ड सक्रिय असल्यास काय धोका असतो?

PAN कार्ड हे एक आर्थिक ओळखीचे महत्त्वाचे दस्तावेज आहे. बँकिंग व्यवहार, गुंतवणूक, मालमत्ता खरेदी-विक्री, कर्ज प्रक्रिया, सरकारी योजनांचा लाभ – अशा अनेक बाबतीत याचा वापर होतो. मृत व्यक्तीचे PAN कार्ड रद्द न केल्यास, त्याचा वापर कोणीही फसवणूक, कर्ज घ्यायचे व्यवहार, बोगस खाती उघडणे अशा अनधिकृत गोष्टींसाठी होऊ शकतो.

PAN कार्ड रद्द न केल्यास कायदेशीर अडचणी

मृत व्यक्तीच्या नावाने जर फसवणूक झाली, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
IT विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता वाढते.
मृत व्यक्तीच्या आर्थिक वारशाचा गैरवापर होऊ शकतो.

PAN कार्ड रद्द करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

PAN कार्ड रद्द करण्यासाठी कायदेशीर वारसाने खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे:

मृत व्यक्तीचे मूळ PAN कार्ड
मृत्यू प्रमाणपत्राची छायांकित प्रत
PAN रद्द करण्यासाठीचा अर्ज
अर्जदाराचे PAN कार्ड व आधार कार्ड
मृत व्यक्तीशी नाते सिद्ध करणारे दस्तऐवज
इच्छापत्र किंवा कायदेशीर अधिकार पत्र (legal heir certificate)

वारशाचा अधिकार आणि अंतिम रिटर्न

PAN रद्द करण्याआधी, मृत व्यक्तीच्या आखेरच्या आयकर रिटर्नसाठी त्याचे कायदेशीर वारस नोंदवणे आवश्यक आहे. त्यामुळे फायनान्शियल ट्रान्सफर योग्य वारसापर्यंत पोहोचते आणि आयकर विभागाशी संबंधित अडचणी टाळता येतात.

हेही वाचा : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू – अदिती तटकरे.

Share This Article