आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून लष्करी प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा Basic Military Training In Maharashtra Schools

2 Min Read
Basic Military Training In Maharashtra Schools Dada Bhuse Announcement

Maharashtra Government News | महाराष्ट्र | 2 जून 2025 : Basic Military Training In Maharashtra Schools Dada Bhuse Announcement – राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि संघटनेचे मूल्य बालपणीपासूनच रुजावे, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच मूलभूत लष्करी प्रशिक्षण (Basic Military Training) दिले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.

शालेय शिक्षण आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना महिन्याच्या शेवटच्या शनिवारी नियमित लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि संघभावना यांचे प्रशिक्षण दिले जाईल.

माजी सैनिकांची महत्त्वाची भूमिका

या प्रशिक्षणासाठी राज्यातील सुमारे 2.5 लाख माजी सैनिक, तसेच एनसीसी, स्काऊट गाईड्स आणि क्रीडा शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. मुलांना प्रत्यक्ष लष्करी शिस्त, व्यायाम पद्धती, आणि स्वसंरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

दादा भुसे म्हणाले की, “आजच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा रुजविणे तितकेच आवश्यक आहे. लहान वयात शिस्त, व्यायाम आणि सामाजिक जबाबदारी शिकवली गेल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दीर्घकालीन असतील.”

काय होणार लाभ?

देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होणार
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती
लष्करी करिअरसाठी तयारी
समाजात शिस्त आणि उत्तरदायित्वाची जाणीव

राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षण धोरणामध्ये एक नवे वळण देणारा असून, भविष्यात या उपक्रमाचा सकारात्मक प्रभाव विद्यार्थ्यांवर, समाजावर आणि राष्ट्रावर दिसून येईल, असा विश्वास शिक्षण खात्याने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातही आता अशी बनणार अंतिम यादी; सरकारचा स्पष्ट संदेश.

Share This Article