आता या नागरिकांना ITR भरण्याची गरज नाही? जाणून घ्या सरकारने कोणाला दिला आहे दिलासा ITR Filing Exemption

2 Min Read
ITR Filing Exemption Senior Citizens Section 194P

ITR Filing Exemption Senior Citizens Section 194P : नविन आर्थिक वर्ष सुरू झाले असून, 2025–26 साठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयकर विभागाने यावर्षीचे फॉर्म आधीच प्रसिद्ध केले असून, अनेक जण आता ई-फायलिंग युटिलिटी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाला ITR भरण्याची गरज असतेच अस नाही. विशेषत: काही नागरिकांना ITR फायलिंगपासून सूट मिळते.

आयकर कायदा 1961 मधील कलम 194P अंतर्गत ७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या भारतीय नागरिकांना आयकर विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आली आहे, पण त्यासाठी काही अटी लागू होतात. जर तुमच वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्ही भारतात राहत असाल, आणि तुमच एकमेव उत्पन्न पेन्शन आणि त्याच बँकेत जमा होणार व्याज असेल तर तुम्हाला ITR भरायची गरज नाही.

यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेला एक घोषणापत्र (Declaration) द्याव लागत. त्या घोषणेनुसार बँक तुमच एकूण उत्पन्न, सूट, कपात इत्यादींचा विचार करून थेट तुमच्या उत्पन्नातून योग्य तेवढा कर कपात करते. यानंतर तुम्हाला आयकर विवरणपत्र भरण्याची आवश्यकता उरत नाही.

ही सवलत सरकारने वयोवृद्ध नागरिकांसाठी त्यांची कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी दिली आहे. निवृत्तीनंतर आरोग्य आणि आर्थिक व्यवस्थापन करत असलेल्या नागरिकांना दरवर्षीच्या ITR फायलिंगच्या झंझटीतून मुक्त करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही वरील अटींमध्ये बसत असाल, तर तुम्हाला ITR फाइल करण्याची गरज नाही.

हेही वाचा : DigiPin म्हणजे काय? आता तुमच्या घरालाही मिळणार युनिक डिजिटल ओळख! जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Share This Article