PM Mudra Yojana: या योजनेचा लाभ कोणाला मिळतो आणि कोणाला मिळत नाही? येथे जाणून घ्या

2 Min Read
PM Mudra Yojana Benefit Eligibility Rules

PM Mudra Yojana Benefit Eligibility Rules : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत देशभरातील लघु व्यवसाय सुरू करणाऱ्या किंवा व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या लाखो लोकांना आर्थिक मदत मिळते. मात्र, काही विशिष्ट अटी आणि पात्रता निकषांमुळे काही लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना?

मुद्रा योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली असून, देशात स्वरोजगाराला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, जे तीन गटांमध्ये विभागले जाते:

शिशु श्रेणी – ₹५०,००० पर्यंत
किशोर श्रेणी – ₹१० लाख पर्यंत
तरुण श्रेणी – ₹२० लाख पर्यंत

या कर्जासाठी कोणतीही हमी किंवा गहाण ठेवण्याची गरज नसते, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे.

या योजनेसाठी कोण पात्र नाही?

सर्वांसाठी ही योजना खुली असली तरी खालील लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही:

गैर-भारतीय नागरिक (Non-Indian Citizens)
बँकांकडून डिफॉल्टर घोषित केलेले व्यक्ती
कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या किंवा संस्था
अशी व्यक्ती ज्याचे बँक खाते नाही
वय १८ वर्षांखालील अर्जदार

केवळ पात्र आणि विश्वासार्ह अर्जदारांनाच लाभ मिळावा हा या अटींचा उद्देश आहे.

अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:

व्यवसाय योजना (Business Plan)
प्रकल्प अहवाल (Project Report)
ITR व सेल्फ टॅक्स रिटर्न प्रती
आधार कार्ड, PAN कार्ड, ओळखपत्र
व्यवसायाचे व राहत्या ठिकाणाच्या पत्त्याचा पुरावा

वरील कागदपतत्रे अपूर्ण असतील तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

हेही वाचा : आजपासून UPI व्यवहार होणार अधिक जलद – PhonePe, Google Pay वापरकर्त्यांना मिळणार नव्या अपडेटचा फायदा.

Share This Article