या योजनेत एकदाच गुंतवणूक करा, दरवर्षी मिळवा ₹1.11 लाखांपर्यंत हमखास परतावा Post Office Monthly Income Scheme

2 Min Read
Post Office Monthly Income Scheme MIS Returns Benefits 2025

Post Office Monthly Income Scheme MIS Returns Benefits 2025 : नियमित उत्पन्नासाठी स्थिर आणि सुरक्षित पर्याय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme – MIS) उत्तम पर्याय ठरू शकतो. केवळ एकदाच गुंतवणूक करून दरमहा निश्चित रक्कम मिळवण्याची सुविधा असलेल्या या योजनेत सध्या 7.4% दराने व्याज दिल जात आहे.

काय आहे मासिक उत्पन्न योजना?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही केंद्र सरकार समर्थित लघु बचत योजना आहे. यात खातेदाराला मासिक व्याजाच्या स्वरूपात निश्चित उत्पन्न मिळते. या योजनेत एकल किंवा संयुक्त (जॉइंट) स्वरूपात खाते उघडता येते.

कमाल गुंतवणूक व उत्पन्न

संयुक्त खाते: 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यावर महिन्याला ₹9,250 म्हणजेच वर्षभरात ₹1,11,000 पर्यंत व्याज मिळू शकते.
एकल खाते: 9 लाख रुपये गुंतवणुकीवर महिन्याला ₹5,550 म्हणजेच दरवर्षी ₹66,660 व्याज मिळू शकते.
किमान गुंतवणूक ₹1,000 असून ती 1,000 च्या पटीत करता येते.

योजनेची वैशिष्ट्ये

ही योजना 5 वर्षांसाठी असते, मात्र त्यानंतर नव्या व्याजदराने ती पुढे सुरु ठेवता येते.
TDS लागू होत नाही, मात्र व्याजावर कर लागतो.
एकाच खातेदाराच्या नावाने अनेक खाती उघडता येतात.
खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्टात फ्रीमध्ये ट्रान्सफर करता येते.
सरकारची 100% सुरक्षा आहे.

पूर्वमुदती पैसे काढल्यास दंड

पहिल्या वर्षात रक्कम काढता येत नाही.
1 ते 3 वर्षांत अकाउंट बंद केल्यास मूळ रकमेच्या 2% दंडाची तरतूद आहे.
3 ते 5 वर्षांमध्ये बंद केल्यास 1% दंड आकारला जातो.

हेही वाचा : अखेर संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल; हवामान विभागाचा अंदाज.

Share This Article