Fastag Annual Pass 2025 Rules Private Vehicles Only Apply Online : रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 3,000 रुपयांमध्ये मिळणाऱ्या ‘Annual FASTag Pass’ ची घोषणा केली आहे. मात्र, हा पास सर्व वाहनांसाठी उपलब्ध नसेल. कोणाला आणि कसा मिळणार आहे हा पास? संपूर्ण माहिती येथे वाचा.
काय आहे ‘Annual FASTag Pass’?
वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी 18 जून रोजी एक्स (Twitter) वरून या नव्या पासबाबत घोषणा केली. हा पास 3,000 रुपयांमध्ये वर्षभरासाठी लागू असेल किंवा 200 टोल प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी पूर्ण होईल तिथपर्यंत वैध असेल. म्हणजेच एका टोलची एक ‘यात्रा’ गृहीत धरली जाणार आहे.
कधीपासून उपलब्ध होणार?
हा पास 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर नागरिक तो NHAI किंवा MORTH यांच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन पद्धतीने बनवू शकतील. त्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात येणार आहे. तसेच, एकदा वैधता संपल्यानंतर हा पास रिन्यू करता येणार आहे.
कोण करू शकेल अर्ज?
या वार्षिक FASTag पासचा लाभ फक्त खासगी (non-commercial) वाहनधारकांनाच मिळणार आहे. यामध्ये कार, जीप, व्हॅन यांचा समावेश आहे. व्यावसायिक वाहने – जस की बस, टॅक्सी, ट्रक इत्यादींसाठी हा पास लागू होणार नाही.
रोजच्या प्रवासात टोलच्या त्रासापासून सूट हवी असेल, तर खासगी वाहनधारकांसाठी हा वार्षिक FASTag पास एक उत्तम पर्याय आहे. फक्त 3,000 रुपयांत वर्षभर किंवा 200 टोल प्रवासांपर्यंतचे शुल्क आधीच भरले जाईल, त्यामुळे वेगाने प्रवास करता येईल आणि वेळेचीही बचत होईल.
हेही वाचा : UPI फ्रॉडपासून सावध! मोबाईलवरून पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा.