RBI 500 Note Ban Rumors PIB Response 2026 Fact Check : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की 2026 पर्यंत ₹500 च्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
एका यूट्यूब चॅनेलने आपल्या व्हिडिओत दावा केला आहे की केंद्र सरकारने ₹500 च्या नोटांची छपाई बंद केली असून मार्च 2026 नंतर त्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे, आणि अनेकांनी यावर विश्वासही ठेवला आहे.
मात्र, या दाव्यांवर स्पष्टीकरण देताना भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने म्हटल आहे की ₹500 च्या नोटा बंद करण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा रिझर्व्ह बँकेने केलेली नाही. त्यामुळे सध्या ₹500 च्या नोटा पूर्णपणे वैध चलन म्हणून वापरात राहणार आहेत.
₹2000 च्या नोटांच काय?
गेल्या वर्षी मे 2023 मध्ये, रिझर्व्ह बँकेने ₹2000 च्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या नोटाही अजून वैध चलनच आहेत. RBI च्या देशभरातील 19 इश्यू ऑफिसेसमध्ये नागरिक 2000 रुपयांच्या नोटा जमा करून त्याऐवजी पैसे आपल्या खात्यात जमा करून घेऊ शकतात. जर कोणी स्वतः बँकेत जाऊ शकत नसेल, तर भारतीय पोस्टाद्वारेही त्या नोटा पाठवून रक्कम मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
हेही वाचा : या योजनेतून फक्त आधार कार्डवर मिळते ८० हजारांपर्यंत कर्ज; कोणत्याही हमीशिवाय.