या कारणामुळे 5 लाख महिलांना आर्थिक मदतीपासून मुकाव लागणार; महिलांसाठी सरकारच आवाहन Ladki Bahin Yojana KYC Issue

2 Min Read
Ladki Bahin Yojana KYC Incomplete Women Benefits Issue Maharashtra

मुंबई : Ladki Bahin Yojana KYC Incomplete Women Benefits Issue Maharashtra — राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असली, तरी सुमारे ५ लाख पात्र महिलांना ‘केवायसी’ प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचित राहाव लागणार आहे.

केवायसी न झाल्याने ५ लाख पात्र महिला वंचित

राज्य सरकारकडून १ जून ते १ जुलै २०२५ या कालावधीत आधार, बँक तपशील आणि उत्पन्न प्रमाणपत्र यांसह आवश्यक केवायसी कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आणि नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने सुमारे ५ लाख पात्र महिलांना मे महिन्याचा हफ्ता मिळाला नाही. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांना पुढच्या महिन्यापासून सुद्धा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अशा महिलांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

उत्पन्न पडताळणी

सरकारने अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आणि फक्त गरजूंनाच या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उत्पन्न कर विभागाच्या डेटाचा वापर करून लाभार्थी पडताळणी सुरू केली आहे. या प्रक्रियेमुळे अर्जात खोटी माहिती देऊन लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज नाकारले जाणार आहेत.

महिलांसाठी सरकारच आवाहन

राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामुळे पात्र महिलांना वेळेवर आणि विनाअडथळा आर्थिक मदतीचा लाभ मिळेल, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : ६० वर्षांनंतर दर महिन्याला ५ हजार रुपये पेन्शन मिळवण्याची सुवर्णसंधी.

Share This Article