PM Free Laptop Yojana Fact Check Fake Or Real : मागील काही दिवसांत सोशल मीडियावर, युट्यूब व्हिडिओंमध्ये आणि काही वेबसाइट्सवर असा दावा करण्यात येतो आहे की, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी ‘पिएम मोफत लॅपटॉप योजना’ सुरू केली असून, पात्र विद्यार्थ्यांना अर्ज केल्यावर मोफत लॅपटॉप मिळणार आहे. अनेक विद्यार्थी आणि पालक या माहितीवर विश्वास ठेवून अर्ज करण्याचा विचार करत आहेत. पण या योजनेमागे नेमक काय सत्य आहे? आणि ही योजना खरोखरच सुरू आहे का? याची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे.
काय आहे ‘PM Mofat Laptop Yojana’ विषयीचा दावा?
व्हायरल झालेल्या युट्यूब व्हिडिओंमध्ये आणि काही ब्लॉग पोस्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली असून, अर्ज करणाऱ्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप दिला जाईल. काही ठिकाणी यासाठी स्टेप-बाय-स्टेप अर्ज प्रक्रिया दिली गेली आहे, तसेच बनावट पोर्टल्सवर अर्ज करण्याचे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारने दिलेली अधिकृत माहिती काय सांगते?
सरकारच्या कोणत्याही अधिकृत वेबसाईट (जसे की pmindia.gov.in, mygov.in, किंवा education.gov.in) वर ‘PM Mofat Laptop Yojana’ नावाची कोणतीही योजना सध्या अस्तित्वात नाही. याचा अर्थ असा की हा दावा चुकीचा आहे आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारा आहे.
भारत सरकारने अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेची घोषणा केली नाही, आणि त्यामुळे या संदर्भातील सर्व व्हायरल संदेश हे अफवा पसरवणारे आहेत.
फसवणुकीची शक्यता — विद्यार्थ्यांनी सावध राहावे
PM Free Laptop योजनेच्या नावाखाली अनेक बनावट वेबसाइट्स विद्यार्थ्यांकडून व्यक्तिगत माहिती, आधार क्रमांक, बँक डिटेल्स आणि मोबाईल नंबर मागत आहेत. याचा वापर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा वेबसाईट्सवर माहिती भरू नये आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा वैयक्तिक व्यवहार करू नये.
विध्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ‘फॅक्ट चेक’ सल्ले
कुठल्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी सरकारी अधिकृत वेबसाईट तपासा.
व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स, युट्यूब व्हिडिओ किंवा अनोळखी वेबसाइट्सवर विश्वास ठेवू नका.
बनावट योजना आढळल्यास cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा.
हेही वाचा : अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू; सरकारचा स्पष्ट इशारा.