मुंबई | ८ जून २०२५: Fake 500 And 200 Notes Identification Guidelines RBI Report 2025 — देशात नकली नोटांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालात उघड झाले आहे. विशेषतः ₹500 आणि ₹200 मूल्याच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे रोखीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
आरबीआयचा अहवाल धक्कादायक
आरबीआयच्या अहवालानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण २,१७,३९६ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ₹500 च्या १,१७,७२२ नोटा आणि ₹200 च्या ३२,६६० नोटा होत्या. ही बनावट नोटांची संख्या चिंताजनक असून, सामान्य बँक व्यवहारांमधूनच ही नाणी जनतेपर्यंत पोहोचत आहेत, हे अधिक धक्कादायक आहे.
रोखीने व्यवहार करताना काय करावे?
कोणत्याही दुकानात किंवा व्यक्तीकडून ₹500 किंवा ₹200 ची नोट स्वीकारण्याआधी तिची तपासणी करा
रंग, आकार, वॉटरमार्क, सुरक्षा धागा यांची खात्री करून घ्या
शंका आल्यास ती नोट जवळच्या बँकेत घेऊन जा आणि ती खरी असल्याची खात्री करून घ्या
CCTV मध्ये व्यवहाराचे रेकॉर्डिंग असल्यास फसवणुकीपासून बचाव होऊ शकतो
₹500 च्या खऱ्या नोटांची ओळख:
रंग: स्टोन ग्रे
आकार: 66mm x 150mm
मुख्य चित्र: महात्मा गांधी
सुरक्षा धागा: रंग बदलणारा (हिरव्या ते निळा)
वॉटरमार्क: गांधीजींचा चेहरा आणि ‘500’
पाठीमागे: लाल किल्ल्याचे चित्र
₹200 च्या खऱ्या नोटांची ओळख:
रंग: पिवळा
आकार: 66mm x 146mm
मुख्य चित्र: महात्मा गांधी
पाठीमागे: साँची स्तूप
सुरक्षा चिन्हे: दृष्टिबाधितांसाठी उभे खुणा, सुरक्षा धागा, ‘स्वच्छ भारत’चा लोगो
नागरिकांना सूचना:
देशभरात नकली नोटांचा सुळसुळाट होत असल्याने सर्व नागरिकांनी रोखीचे व्यवहार करताना सावध राहणे अत्यावश्यक आहे. केवळ आर्थिक नुकसानच नव्हे तर फसवणुकीसाठी कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यवहारात करताना सुजाण ग्राहक म्हणून स्वतःची जबाबदारी पार पाडा.
हेही वाचा : नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता वाढणार? ९३ लाख शेतकरी ७व्या हप्त्यासाठी पात्र.