Free Aadhaar Update Online: घरबसल्या करा मोफत आधार कार्ड अपडेट! UIDAI ने दिली अंतिम संधी

2 Min Read
Free Aadhaar Update Online Till June 14

मोफत आधार अपडेट करण्यासाठी UIDAI ने दिली अंतिम मुदत – घरबसल्या करा Aadhaar अपडेट


Free Aadhaar Update Online Till June 14 : आधार कार्ड हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. सरकारी योजना असोत किंवा बँकिंग व्यवहार, आधारशिवाय अनेक कामे अडकतात. त्यामुळे आधारमधील माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नागरिकांना दिलासा देत, १४ जून २०२५ पर्यंत आधार मधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक यांसारखी माहिती ऑनलाईन मोफत अपडेट करण्याची संधी दिली आहे.


आधार मोफत अपडेट करण्यासाठीची मूळ अंतिम तारीख १४ डिसेंबर २०२४ होती UIDAI ने ही डेडलाइन वाढवली असून UIDAI ने आता नागरिकांना अतिरिक्त वेळ दिला आहे. या कालावधीत PoI (Proof of Identity) आणि PoA (Proof of Address) दस्तऐवज मोफत अपडेट करता येतील. १४ जूननंतर मात्र कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल.


घरबसल्या ऑनलाईन मोफत आधार अपडेट कसे करायचे?


UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://myaadhaar.uidai.gov.in

‘Login’ वर क्लिक करा आणि आपला आधार क्रमांक टाका

कॅप्चा कोड व OTP टाकून लॉगिन करा

‘Document Update’ या पर्यायावर क्लिक करा

अद्ययावत करायची माहिती निवडा आणि संबंधित डॉक्युमेंट अपलोड करा

सर्व माहिती तपासून फॉर्म सबमिट करा

सबमिट केल्यावर Service Request Number (SRN) मिळेल, ज्याद्वारे तुम्ही अपडेट स्टेटस तपासू शकता

UIDAI च्या नियमानुसार, आधार धारकांनी दर १० वर्षांतुन एकदा आधार कार्ड मधील पत्ता अद्ययावत करणे आवश्यक आहे, जेणेकरून आधार कार्डमधील माहिती अचूक राहील.

हेही वाचा : तुम्ही पात्र आहात का? येथे तपासा.

Share This Article